Wednesday 11 January 2017

"विचार करा"

एकदा एका शब्दाने दुसऱ्या शब्दाला विचारले .....
‘काय रे, तुझी जात कोणती रे...???’ तस घाबरतच विचारले त्याने...कारण तो त्याचा जवळचा मित्रच होता. दुसरा शब्द गालातल्या गालात हसला...आणि कळल्यासारखं परत विचारले, का रे...? तुझी आणि माझी मैत्री जुनी आहे ... मग आजच असा प्रश्न तू का विचारलास मला...? असे का वाटले तुला ...? पहिला शब्द थोडासा गोन्धळाला पण लगेचच स्थिर होऊन ... सांग ना..? पण का असे विचारलेस सांग ना ?आपल्या मैत्रीत काय चुकले आहे का ?? दुसऱ्या शब्दाने हसतच पण थोडं गंभीर होऊन विचारले ...नाही रे ... मी असाच विचारले .  ओके.. मग मला आधी सांग तुझी जात कोणती ????? थोडासा विचारशीलपने प्रश्न केला ..दुसऱ्या शब्दाच्या या प्रश्नाला अगदी सहजच उत्तर मिळाले ... " क्रियापद".  दुसरा शब्द हसतच उत्तरला ....हे तुला कोणी सांगितले ???  पहिल्या शब्दाला काय समजेना ..... म्हणजे ..???. असा बाळबोध प्रश्न पहिल्या शब्दाने विचारला. दुसऱ्या शब्दाने मग अतिशय गंभीर होऊन समजावून सांगण्यास सुरवात केली....हे बघ मित्रा...तुझी- माझी कुळी मुळी आपण जर काढत गेलो तर ती एकच येईल. मग सुरवातीला होती का जात ??? मग सुरवातीला होता का धर्म ???? एकमेकांना मदत करत जगणं होत त्यांचं. त्यातून प्रत्येकजण जन्माला आला...आता कोणाच्या मुखातून, कोणता शब्द,केव्हा बाहेर आला हे पाहिलेय का कोणी ??? सांग ना तूच ???? नाही ना ....??? मग आपण कशी ठरवली आपली जात..???? कोणत्या जातीच्या ओठातून शब्द पडतो त्यावरून ..??? कि त्याच्या किमतीनुसार ..??? सांग ???   पहिल्या शब्दाला एवढे बौद्धिक जास्तच झाले बहुतेक तसा तो गोंधळूनच बोलला...नाही रे .... पण माणसांनी ठरवल्या ना आपल्या जाती..त्यांनीच केलं ना आपले वर्गीकरण ... तस दुसरा शब्द हसतच बोलला ...अरे हाच आपला प्रॉब्लेम आहे ...त्यांनी ठरवले आणि आम्ही वेगळे झालो..त्यांनी सांगितले म्हणून आम्ही गटात बसत गेलो...त्यांच्या स्वार्थासाठी,त्यांनी ठरवले आणि आम्ही सहजच विभागलो...का....????कारण आपल्याला आपले अस्थित्व माहित नाही किंवा आपण ते विसरलोय किंवा आपल्याला कळते आहे पण आपल्याला वळवायचे नाही आहे...???  बरोबर ना....पहिल्या शब्दाला बरोबर वाटलं.. तस त्याने मानेनंच सांगितलं.... ‘अरे आपली जात आहे "स्वर" आणि धर्म आहे "व्यंजन". हेच आपले मूळ आहे.’ पण मानवांनी त्यांच्या सोयीसाठी आपले वर्गीकरण केले.
संधी,जाती ,प्रयोग,समास,अलंकार,वृत्ते,शब्द सिध्दी,विरुद्धार्थी शब्द,समानार्थी शब्द, काळ . प्रकारे आपले वर्गीकरण केले. आणि आम्ही हि सहजच वेगळे झालोय.... यावर ...’होय रे.... खरंच कि’ ....असा पहिला शब्द बोलला..अरे आपल्याला वेगळे केलेच पण खरी गंमत हि कि मानवाने मानवानेच वर्गीकरण केले आहे ....थोडंसं हसरा चेहरा करत दुसरा शब्द पुढे बोलला...  ‘अरे त्यांनी त्यांच्याच अनेक जाती, अनेक धर्म पाडलेत...त्यातच ते अडकून पडलेत..त्यांचेही असेच झाले आहे अगदी तुझ्यासारखे...त्यांनाही आपला खरा धर्म, आणि खरी जात लक्षातच येत नाही आहे....."माणूस" हि त्यांची खरी जात आहे, आणि "माणुसकी" हा खरा धर्म ...पण ते विसरलेत पोटं भरण्याच्या नादात’...’हो यार ...खरंच आहे हे’...असे पहिल्या शब्दाच्या तोंडातून बाहेर पडले... ‘असो, आपण तरी एकी ठेऊ आपल्यामध्ये..’ असे दुसऱ्या शब्दाचे वाक्य ऐकून पहिला शब्द भानावर आला आणि बोलला.... ‘सॉरी यार ..मला माफ कर..मी आता कोणालाच असे नाही विचारणार उलट तू सांगितलेली माहिती मी इतरांना सांगणार भावा...खरंच आपल्यात एकी हवी....थँक यू भावा ....’ ‘अरे तू माझा चांगला मित्र आहेस थँक यू , सॉरी काय ...तुला चांगले सांगणे माझे कर्तव्यच आहे ...’ असे हसत, टाळी देत दुसरा शब्द बोलला...टाळीला साथ देत पहिल्या शब्दाने दुसऱ्या शब्दास मिठी मारली...
                                         ‘ ते दोन शब्द म्हणजे "विचार करा". ‘

                                                                                                        ----   रविंद्र .वराळे

No comments:

Post a Comment