Sunday 8 January 2017

                                "शब्द"  
माझी माय म्हणते ......
     आमच्यावेळी शब्दाला लय किमत असायची.....
       “शब्दासाठी जागायच्या सावूल्या.....
        शब्दासाठी जगायच्या मावूल्या....
        शब्दासाठी चालायचे पाउल......
        शब्दानेच जन्मायाचे देऊळ......”
मी म्हणालो...... माय आता हि तसेच आहे......
            “ देऊळात शब्दाचा जन्म धर्मात होतो
                    पाउल जातीचा होतो
             माउल्याच कोवळ्या जम्नावर उठतात
                   सावूल्या चढाओढीत फसतात....”
    असतात तेच शब्द........ फसवतात तेच शब्द.......
     कधी अंधश्रद्धेच्या जाळ्यात अडकवतात, तर कधी जातीच्या नावाने भडकवतात.....
‘सुशिक्षित’ या शब्दचा अर्थच गवसला नाही अजून दिग्रीवाल्यांना.... व्यसनाधीन बनलेल्या तरुणांना.... काय माहित त्यांना “व्यसन” चा अर्थ काय घ्यायचा??? शब्दांचाच खेळ आहे सारा..... त्यात मनाचा विस्कटलेला पसारा... आता, कोण पुसतो शब्दाला... कोण जागतो शब्दाला.....
“आधी लगीन कोंढाण्याचे मग....... ”असे शब्द इतिहासातच पाहायला मिळतात अलीकडे. फसवणूक,लुबाडणूक,चारित्र्यहीन,लबाड बोलणे अशा शब्दातच गुरफटत गेलोय आपण....धर्म,जात,पंथ,स्त्री-पुरुष,मान-सन्मान,उच्च-निच्च अशा कितेक शब्दात आम्ही अडकलोय,अडकत गेलोय ... रंगाच्या नावाखाली दंगली घडवतात....घडतात आणि मग, दगड-काठ्यांनी साचलेल्या,रक्ताळलेल्या रस्त्यावरच्या एका बाजूच्या चौकातल्या कट्यावर बसून सहिष्णुताचे भन्नाट विचार मांडायचे. शब्दांच्या अधीन व्हायचे कि शब्दांना गुलाम करायचे ...??? कोडेचं सुटेनासे झालय ..... ‘सैराट’ झालेल्या वातावरणात तराठ सुटलोय आपण ....आणि कुठतरी न माहित असलेल्या ‘सुख’या शब्दाच्या शोधात वाळवंटात भटकतोय.....मृगजळ पाहून धावतोय धावतोय ....धावतोय आणि तोंडाला फेस आलेल्या बैलासारखे दमून भागून मग सावलीची अपेक्षा करणाऱ्या मनाची तहान संपणार का कधी?? पवित्रता,दिव्यता,निर्मलाता,सात्विकता,सकारात्मकता,संमान्नता,सभ्यता,शालीनता,संतुष्टता,श्रेष्ठता,स्वतंत्रता,सत्यता,नैतिकता,योग्यता,भावना,सयमं,स्वार्थी,आशा,प्रेम,बंधने,अशा अनेक शब्द्नाभोवती आपण आयुष्य खर्ची घालवतो आणि मग शेवटी आयुष नेमके काय ???? या शब्दाची उकल काढण्यात विचार करतो.....आपण भोगलेले,आपण जगलेले,आपण त्यागलेले असे सारे शब्द एकत्र करून सार काढला तर समजेल का जीवनाची उकल?????
माय म्हणते,
         “उकल जन्माची कळाया
         सुख-दुखाची क्षण मळावे लागतात
         हाताने थापून आकार द्यावा लागतो
        आणि खमंग भाजलेली भाकर आपली भूक भागवते”
   ‘आणि मग ......आणि भूक लागते..........’
                  अशी ती पुढे गमतीने म्हणते.........
                                                  -रविंद्र वराळे

No comments:

Post a Comment